facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / जय गुरुदेवबाबाच्या कार्यकमात झाली चेंगरा चेंगरी ,१९ जणांचा मृत्यु
up

जय गुरुदेवबाबाच्या कार्यकमात झाली चेंगरा चेंगरी ,१९ जणांचा मृत्यु

आवाज न्यूज नेटवर्क

वाराणसी –

बाबा जय गुरुदेव यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यात आली होती. त्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ही पदयात्रा राजघाट पुलावरून जात असताना चेंगराचेंगरी झाली. यात १९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक दिल्लीहून लखनऊकडे रवाना झाले आहेत.

वाराणसी येथील बाबा जय गुरुदेव यांच्या कार्यक्रमात आज झालेल्या चेंगराचेंगरीत १९ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते. स्थानिक प्रशासनाने जखमींना जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केलं आहे.

 पंतप्रधान मोदींकडून चेंगराचेंगरीत ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *