facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / शाळकरी मुलींवर लैगिक अत्याचार
download-3

शाळकरी मुलींवर लैगिक अत्याचार

आवाज न्यूज नेटवर्क- पाटेगाव

दोघा आरोपींनी या अल्पवयीन मुलींशी प्रेमाचे नाटक केले. त्यांना जामखेड जवळील सौताडा येथे फिरण्यास घेऊन गेले व तेथे जाऊन या मुलींसोबत फोटो काढले. हे फोटो काढल्यानंतर त्या दोघींना आरोपींनी, तुम्ही आमच्यासोबत प्रेम करा, नाहीतर तुमचे फोटो व्हायरल करून तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली. या धमकीमुळे संबंधित पीडित मुली घाबरल्या होत्या. या दोघांना कर्जत येथील स्वराज लॉज येथे बोलावून त्यांच्यावर मागील तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले, असे पीडिल मुलींनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस तपास करीत आहेत.

कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील दोन अल्पवयीन मुलींवर गावातील दोघा तरुणांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानुसार दोघा तरुणांवर कर्जत पोलिस स्टेशनला बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

तुषार बबन लाड (वय २१) व राहुल गोविंद लाड (वय २१, दोघे रा. पाटेगाव, ता. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोन्ही पीडित मुलींच्याबाबतीत एकसारख्याच घटना घडल्या आहेत. पीडित दोघी अल्पवयीन शाळकरी मुली आहेत.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *