facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / अण्वस्त्रांना हवेतच संपवणारे यंत्र आता भारताकडे

अण्वस्त्रांना हवेतच संपवणारे यंत्र आता भारताकडे

आवाज न्यूज नेटवर्क

गोवा –

केंद्र सरकारकडून रशियासोबत संरक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. सोव्हिएतकालीन लष्करी उपकरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी १००० कोटी डॉलरचा करार करण्यात आला आहे. मागील महिन्यात भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमान खरेदीचा करार केला आहे. राफेल विमाने भारताला फ्रान्सकडून ठरलेल्या वेळेपेक्षा ३६ महिने आधीच मिळणार आहेत. गेल्या दशकापासून प्रलंबित असलेला हा करार केंद्र सरकारने मार्गी लावला आहे.

 

एस-४०० रशियाची सर्वाधिक आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे. ही यंत्रणा सध्या रशियाकडून सीरियामध्ये तैनात करण्यात आली आहे. याच यंत्रणेचा वापर करुन रशिया सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थनार्थ बॉम्बफेक करते आहे. या यंत्रणेच्या मदतीने ३०० ठिकाणांना ट्रॅक करता येऊ शकते. ४०० किलोमीटर अंतरावर असणारी ३६ लक्ष्ये भेदण्याचे सामर्थ्य या यंत्रणेत आहे. विशेष म्हणजे एस-४०० मध्ये स्टिल्थ विमानांना ट्रॅक करणारी यंत्रणा आहे. स्टिल्थ विमाने सामान्य रडारवर दिसत नाहीत. मात्र एस-४०० मधील यंत्रणा या विमानांनादेखील ट्रॅक करु शकते.

भारत आणि रशियामध्ये अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी यासंबंधीच्या करारवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराअंतर्गत पाच एस-४०० ट्रायंफ क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणेसाठी भारत ३९ हजार कोटी रुपये देणार आहे. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी या क्षेपणास्त्राचा वापर करता येऊ शकतो.

यामुळे भारताला अणू उर्जा प्रकल्प आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचे संरक्षण करणे शक्य होणार नाही. याशिवाय या यंत्रणेमुळे भारताला चीन आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळणार आहे. मोदी आणि पुतीन यांनी नौदलासाठी फ्रिगेट (विनाशिकांना संरक्षण देणाऱ्या नौका) उभारण्याच्या करारवरदेखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याशिवाय केमोव-२२६ हेलिकॉप्टरची संयुक्त निर्मिती करण्याचा निर्णयदेखील दोन्ही देशाच्या प्रमुखांनी घेतला आहे.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *