facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / ठाण्यात मराठा सामाज्याचा आक्रोश

ठाण्यात मराठा सामाज्याचा आक्रोश

आवाज न्यूज नेटवर्क

ठाणे-   कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे मोर्चे काढले जात आहेत. रविवारी ठाणे आणि चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील मोर्चामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शहरात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे वाहतूक बदल करण्यात आले.  मोर्चे शांततेत निघत असले तरी पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होते. ठाण्यातील मोर्चामध्ये एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.  ठाण्यातील मोर्चासाठी बदलापूर, कल्याण, डोंबिवलीतील नागरिकही ठाण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर लहान मुलींनी मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या. मराठा समाजाच्या ११ मागण्यांचे निवेदन यानंतर जिल्हाधिका-यांना देण्यात आले. आम्हाला आता सरकारसोबत चर्चा नव्हे तर सरकारची थेट कृती हवी आहे अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. तर कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांविरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी  मोर्चात सहभागी झालेले एकनाथ शिंदे यांनी केली.

maratha-morcha-6 14753190_1679678429014260_2723064421899585192_o

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी ठाण्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील तीन हात नाका येथून सुरुवात झालेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सांगता झाली. तर चिपळूणमध्येही मराठा क्रांती मोर्चासाठी दापोली, रत्नागिरी, राजापूरवरुन लोक आली होती.

चिपळूणमध्ये निघालेल्या मोर्चात विनायक राऊत, भास्कर जाधव आदी नेतेमंडळी सहभागी झाली. महिला आणि तरुणींची मोर्चातील उपस्थिती लक्षणीय आहे.चिपळूणमध्ये पवन तलावाकडे येणा-या रस्त्यांवर गर्दी झाली होती. या दोन्ही मोर्चामध्ये काळा टी शर्ट आणि एक मराठा लाख मराठा अशा संदेश 14708158_1166999180055155_8569236699066996881_n14716195_1396471433711192_748904576869338346_nलिहीलेल्या टोप्या घालून मोर्चेकरी सहभागी झाले होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *