facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / मोदी एक महान नेते ,भारताचा मी मोठा फॅन – डोनाल्ड ट्रम्प

मोदी एक महान नेते ,भारताचा मी मोठा फॅन – डोनाल्ड ट्रम्प

आवाज न्यूज नेटवर्क

न्यू जर्सी

रिपब्लिकन हिंदू युतीच्यावतीने इंडो-अमेरिका जनतेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहे असे सांगतानाच मी हिंदू आणि भारत देशाचा मोठा चाहता (फॅन) असल्याचे प्रतिपादन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाची सत्ता आल्यास भारत आणि अमेरिका हे ‘बेस्ट फ्रेंड’ होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून अमेरिकेचा पारंपारिक सहकारी आहे. आगामी काळात भारत-अमेरिका हे देश अधिक चांगले मित्र बनतील असं म्हणण्याऐवजी मी तर असं म्हणेन की, भारत-अमेरिका सर्वात चांगले मित्र बनतील, असं मला वाटतंय. दोन्ही देश खुल्या व्यापाराचे समर्थन करतात, त्यामुळे आम्ही दुसऱ्या देशांसोबत चांगला व्यापारी करार करु. आम्ही भारतासोबत खूप मोठा व्यापार करणार असल्याने दोन्ही देश असाधारण भविष्याचे साक्षीदार बनतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांच्यावर स्तुती करताना ट्रम्प म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याचा विचार करीत आहे. मोदी यांनी आर्थिक आणि प्रशासकीय सेवात सुधार करण्यासाठी चांगले प्रयत्न चालवले आहेत. ते एक महान नेते आहेत. मी त्यांचे कौतुक करतो. मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर जे पावले उचलली आहेत तेच अमेरिकेतही उचलली जाणे गरजेचे आहे. मोदी यांनी टॅक्ससंदर्भातील नियम साधे केले, टॅक्समध्ये कपात केली. त्यामुळे देशाच्या आर्थिक दरात ७ टक्के वाढ होतेय, हे सर्व वाखाणण्याजोगेच आहे. हिंदू आणि भारताचा मोठा चाहता असून मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर भारतीय आणि हिंदू समाजाचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत असेल असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील हिंदू आणि इंडो अमेरिकन लोकांनी अमेरिकेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले, असे ते म्हणाले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *