facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / साउंडट्रॅक बंद पडल्याने अजय-अतुल संतापले

साउंडट्रॅक बंद पडल्याने अजय-अतुल संतापले

गायक आणि वादक केवळ ‘अभिनय’ करीत होते, तर प्रत्यक्षात साउंडट्रॅकवर गाणे होते. अर्थात, ‘पॉवर कट’ झाल्याचा तंत्रज्ञांनी बनाव केला. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे गायक-संगीतकार अजय-अतुल यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ऐन रंगात आलेली… ‘मल्हारवारी’ गाणे सुरू असतानाच साउंडट्रॅक (सीडी) बंद पडला अन् रसिकांना भलतेच कोडे उलगडले .मकरंद अनासपुरे यांनी हजरजबाबीपणातून कार्यक्रम सावरला, पण जाणकारांना उलगडा झालाच.

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात शनिवारी अजय-अतुल यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ पार पडली. स्वप्नील बांदोडकर, अभिजीत सावंत, कुणाल गांजावाला, योगिता गोडबोले हे लोकप्रिय गायक असल्यामुळे गर्दी होती. ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘जत्रा’ अशा हिट चित्रपटातील गाणी सादर झाली. ‘नटरंग उभा ललकारी नभा’ या गाण्यातून अजय-अतुल यांची झोकात एंट्री झाली. ‘आम्ही बॅक टू बॅक चौदा गाणी घेऊ’ असे अतुल यांनी सांगितले. ‘तुम्ही तयार रहा’ असे रसिकांना आवाहन करीत सादरीकरण सुरू झाले. ‘मल्हारवारी’ टिपेला पोहचलेले असतानाच आवाज बंद पडला. काय करावे असा वादक व खुद्द अजय-अतुल यांना प्रश्न पडला. गाफील वादकांनी ढोल-तबला वाजवण्यास सुरुवात केली. मात्र, गाण्यात रंग भरणे शक्य नव्हते. हजारो रसिकांसमोर कार्यक्रमात व्यत्यय आल्याने अजय-अतुल संतापले. ‘पॉवर कट’ झाल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. रंगमंचावरून सर्वांनी एक्झिट घेतली. बिघाड दुरुस्त करण्यास अर्धा तास लागला. यात प्रायोजकांचे सत्कार उरकण्यात आले. अनासपुरे यांनी अजय-अतुल आपले पाहुणे असून त्यांना सांभाळून घेण्याची विनंती केली. अजय-अतुल यांनी पुढील गाणी मात्र ‘लाइव्ह’ सादर केली.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *