facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / आव्हाडाचा आदित्य ठाकरेंना टोला
download-2

आव्हाडाचा आदित्य ठाकरेंना टोला

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई –

२००४ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर ‘आपलं सरकार’ आल्यासारखं वाटलं होतं. मात्र, आधीचं नालायक सरकार आणि या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, अशी चपराक युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावली होती.

आपल्या सरकारला आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना नालायक म्हणण्याचं धाडस फक्त बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरेच दाखवू शकतात. या धाडसाबद्दल त्यांचं अभिनंदन, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राज्यातील ‘के. जी. टू पी. जी.’पर्यंतच्या शिक्षणात सुरू असलेल्या गोंधळाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महामोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर त्यांनी टीका केलीच, पण संपूर्ण सरकारच नालायक असल्याचा हल्ला चढवला होता. आदित्य ठाकरे यांच्या याच विधानावरून जितेंद्र आव्हाड यांनी सेना-भाजपला लक्ष्य केलंय आणि आदित्य यांनाही टोमणा मारलाय. आपल्याच सरकारचे आणि खास करून शिवसेनेच्या मंत्र्यांचे खरे गुण – अर्थात नालायकपणा दाखवण्याचं धाडस आदित्य यांनी केलंय, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं खोचक ट्विट आव्हाड यांनी केलंय. त्यावरून आता शाब्दिक चकमक रंगण्याची शक्यता आहे.

 

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *