facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / गुंगीचे औषध देवून केला बलात्कार
rapee-1

गुंगीचे औषध देवून केला बलात्कार

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे –  त्रिवेणीनगर येथील ओम या इमारतीमध्ये चौहान याची सिद्धशक्ती कुंडलिनी मेडिटेशन संस्था आहे. तो आयुर्वेदिक औषधोपचार करतो. परदेशात आणि देशाच्या विविध भागात आपल्या संस्था असल्याचे तो सांगत असे. पीडित तरुणी 29 सप्टेंबर रोजी त्याच्या संस्थेत गेली होती. त्यावेळी त्याने चॉकलेटमधून गुंगीचे औषध देवून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे

शहरातील निगडी भागात चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन एका भोंदूबाबाने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा घृणास्पद प्रकार शनिवारी त्रिवेणीनगर येथे उघडकीस आला. रमेश चौहान  या भोंदूबाबाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *