facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / VIDEO: धावत्या ट्रकला आग
download-1

VIDEO: धावत्या ट्रकला आग

आवाज न्यूज नेटवर्क

वर्धा – ही घटना वर्धा-यवतमाळ बायपास मार्गावर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. चालक व क्लिनरने वेळीच कंटेनर सोडल्याने ते थोडक्यात बचावले. यामध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.नव्या कोऱ्या कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण कंटेनर कवेत घेतला. यात कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून खाक झाल्या.

भागीचा भडका जसजसा उडत होता. तसतसा त्यातील कारच्या टायरचा स्फोट होत होता. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच वर्धा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीचे लोळ उठत असल्यामुळे ते निष्फळ ठरले. आग विझवतपर्यंत कंटेनरसह त्यातील नऊही कार जळून राख झाल्या होत्या. यावेळी बघ्याची तोबा गर्दी झाली होती.
दी बर्निंग कंटेनर पाहण्याकरिता परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी पोलीस व अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली, तर काही केवळ दृश्य व व्हिडीओ टिपण्यातच व्यस्त असल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा बायपास मार्गावर सावंगी टी पॉर्इंटपासून तर दत्तपूर चौकापर्यंत अशा सुमारे तीन कि.मी. अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे जडवाहतुक वर्धा शहरातून वळती करण्यात आली होती.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *