facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / नेमबाज अशोक पंडित यांना रिक्षावाल्यानं लुटले
2002111505882001

नेमबाज अशोक पंडित यांना रिक्षावाल्यानं लुटले

आवाज न्यूज नेटवर्क

दिल्ली –

मुंबईचे रहिवासी असलेले ६३ वर्षीय अशोक पंडित गेल्या गुरुवारी दिल्लीला गेले होते. नोएडाला जाण्यासाठी ते स्टेशनबाहेर टॅक्सीची वाट बघत होते. इतक्यात एक रिक्षावाला त्यांच्याजवळ आला आणि ५० रुपयांत नोएडाला न्यायला तयार झाला. आणखी दोन-तीन प्रवासी घेण्याबाबत त्यांनी पंडित यांना विचारलं. त्यांनी त्याला होकार दिला. पण हीच त्यांची मोठी चूक ठरली. कारण हे तीन प्रवासी रिक्षावाल्याचे साथीदार होते आणि पंडित यांना लुटण्यासाठी त्यांनी हे जाळं विणलं होतं.

 देशाच्या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलेले नेमबाज अशोक पंडित यांच्याकडून दिल्लीतील एका रिक्षावाल्यानं २ लाख ४० हजार रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं रिक्षावाल्यानं पंडित यांना गंडा घातला आणि चालत्या रिक्षातून उड्या मारून सगळे पसार झाले. त्यानंतर पंडित यांनी कशीबशी रिक्षा थांबवल्यानं मोठा अपघात टळला.

 

दिल्ली गेटच्या ट्रॅफिक सिग्नलजवळ रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली. चार प्रवासी बसवल्याबद्दल हवालदार दंड करू शकतो, असं सांगत त्यानं दोघांना उतरवलं आणि पुढे जाऊ लागला. तेव्हा, मला संशय आला आणि मी त्याला रिक्षा थांबवायला सांगितली. पण इतक्यात माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीनं चालत्या रिक्षातून उडी मारली. पाठोपाठ रिक्षावाल्यानंही बाहेर उडी घेतली. मग, मागच्या सीटवरूनच मी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रफिकमधून वाट काढताना एका पाण्याच्या ट्रॉलीवर आदळून रिक्षा थांबली. त्यानंतर खाली उतरून मी बॅग तपासली तेव्हा त्यातील २ लाख ४० हजार रुपये गायब होते. मी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली, असा घटनाक्रम अशोक पंडित यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितला.

 

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *