facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / नव्या ट्रेंडमुळे गृहिणींच्या सुप्तगुणांना वाव

नव्या ट्रेंडमुळे गृहिणींच्या सुप्तगुणांना वाव

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे : मातीच्या पारंपरिक पणत्यांना आधुनिक टच देऊन तयार केलेल्या डेकोरेटिव्ह पणत्यांची यंदाही दिवाळीत चलती असणार आहे. या नव्या ट्रेंडमुळे गृहिणींच्या सुप्तगुणांना वाव मिळाला असून, बचत गटांच्या बरोबरीने सध्या महिलावर्ग पणत्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्यात व्यग्र आहे. लहान-मोठ्या प्रदर्शनांपासून, कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच शॉपिंग मॉलपर्यंत या पणत्या आता पोहोचल्या आहेत.
दिवाळीमध्ये पणती हा अविभाज्य घटक असल्याने नवरात्र संपल्यानंतर शेकडो प्रकारच्या पणत्या कुंभारवाडा आणि बाजारपेठांमध्ये दाखल होतात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पारंपरिक पणत्यांऐवजी क्रिएटिव्ह पणत्यांची मागणी वाढली आहे. विविध आकारातील पणत्या घरी आणून, महिलावर्ग त्याला वेगवेगळे रंग, कुंदनच्या टिकल्या, मोती, घुंगरू, आरसे आदी कलाकुसरीच्या वस्तूंनी सजवतात. पणत्यांना मिळालेल्या या आधुनिक टचमुळे ग्राहकांना भुरळ घालण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. दरवर्षी या पणत्यांची मागणी वाढत असल्याने बचत गटांबरोबरच अनेक महिलांना दिवाळीत हक्काचा रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनांबरोबरच कॉर्पोरेट कंपन्यांच्याही गिफ्ट ऑर्डरही महिलांना मिळायला सुरुवात झाली आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *