facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / पाच शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातच रॉकेल ओतुन पेटवून आत्महत्येचा प्रयत्न.
solapur-news

पाच शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातच रॉकेल ओतुन पेटवून आत्महत्येचा प्रयत्न.

आवाज न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी – नागेश सुतार –

सोलापूर : विजय शुगर साखर कारखान्याकडून एफआरपीची रक्कम न मिळाल्याने उंदरगांव (ता़ माढा) येथील पाच शेतकऱ्यांनी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतुन पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला़, ऊसाचे बिल मिळत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या घटनेवेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी झाली नाही.

या घटनेतील जखमींचा शासकीय रूग्णालयात उपचार केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे़, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पाचही शेतकऱ्यांना सदर बझार स्टेशनच्या पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *