facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव

करण जोहरने मुंबई पोलिसांकडे धाव

आवाज न्यूज नेटवर्क-मुंबई

उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तान कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. फवाद खानची प्रमुख भूमिका असलेला ‘ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित होऊ देणार नाही’, असं महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मागेच ठणकावलं होतं. त्यावरून धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसबाहेर मनसैनिकांनी निदर्शनंही केली होती. त्यावेळी, बॉलिवूडमधील काही मंडळी करणच्या मदतीला धावून गेली. पण, नंतर ‘इम्पा’नंच पाक कलाकारांवर बंदीचा निर्णय घेतल्यानं मनसेला बळ मिळालं आणि आता तर त्यांनी ‘ऐ दिल…’ प्रदर्शित होऊ न देण्याचा विडाच उचलला आहे.

 ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास थिएटरच्या काचा फुटतील, अशी तंबी मनसेनं मल्टिप्लेक्स व्यवस्थापकांना दिल्यानंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व मल्टिप्लेक्सना सुरक्षा देऊन आपला सिनेमा ‘खळ्ळ-खटॅक’विना प्रदर्शित होण्यास सहकार्य करावं, असं साकडं त्यानं मुंबई पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना भेटून घातलं. तेव्हा, आवश्यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही मुंबई पोलिसांनी त्याला दिली आहे.
 ‘ऐ दिल…’ प्रदर्शित केलात तर जे परिणाम होतील, त्याला आम्ही जबाबदार नसू. मल्टिप्लेक्सच्या काचा महागड्या असतात हे लक्षात ठेवा, असा सूचक इशारा अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्सवाल्यांना दिला आहे. त्यामुळे करण जोहर पुरता हादरला आहे. या संकटातून मार्ग निघावा म्हणून त्यानं आज मुंबई पोलिसांची भेट घेतली. मनसेनं दिलेली धमकी पाहता, मल्टिप्लेक्सना जास्तीची सुरक्षा पुरवावी, अशी विनंती त्यानं पोलिसांना केली. त्यानुसार, जेव्हा आणि जशी गरज वाटेल तेव्हा मुंबई पोलीस मल्टिप्लेक्सना संरक्षण देतील, असं डीसीपी अशोक दुधे यांनी सांगितलं. त्यामुळे करण जोहरनं सुटकेचा निःश्वास टाकलाय.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *