facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Crime / शिर्डीत पुजाऱ्याने छळापोटी केली आत्महत्या !

शिर्डीत पुजाऱ्याने छळापोटी केली आत्महत्या !

आवाज न्यूज नेटवर्क –

शिर्डी : शिर्डीच्या साई मंदिरातील राजेंद्र पाठक (वय २९) या पुजाऱ्याने आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. मंदिरातील काही पुजारी व कर्मचारी त्यांचा छळ करत होते, त्यातूनच आत्महत्या झाली असल्याचा आरोप पाठक यांच्या भावाने केला आहे. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

साई मंदिरात राजेंद्र पाठक हे पुजारी म्हणून सेवेत होते. पुजारी पाठक यांनी आंतरजातीय विवाह केला होता. याच कारणाने मंदिरातील दोन पुजारी व एक अधिकारी त्यांचा अनेक महिन्यांपासून छळ करीत होते. दसऱ्याच्या दिवशी आराधना विधी मंदिरात केला जातो. या विधीला सपत्नीक पुजारी सामील होतात. राजेंद्र पाठक याने आंतरजातीय विवाह केलेला असल्याने ‘आराधना विधीला तुझ्या पत्नीस सामील होता येणार नाही. तू एकट्यानेच यायचे’ असे फर्मान मंदिरातील अधिकाऱ्याने सोडले होते. तसेच ड्युटीवरूनही त्यांना सतत त्रास दिला जात असे. या आत्महत्येमागे संबधित दोन पुजारी व एक अधिकारी जबादार आहे, असा आरोप पाठक यांचा भाऊ रोहित याने केला आहे.

या घटनेविषयी संस्थानाचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे म्हणाले, ‘छळ होत होता अशी तक्रार राजेंद्र पाठक यांनी यापूर्वी कधीही केली नाही. आज मात्र त्याच्या भावाने तक्रार दिली आहे. चौकशी केली जाईल. कोणी दोषी असल्यास निश्चित कारवाई होईल,’ असे त्यांनी सांगितले.

Check Also

कोपर्डीत मुलींच्या शाळेसाठी मिळेना जागा

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खुनाची घटना घडल्यानंतर सरकार आणि खासगी संस्थांनी विविध आश्वासने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *