facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / भारतीय पत्नी करतात नवऱ्याला मारहाण
download-1

भारतीय पत्नी करतात नवऱ्याला मारहाण

आवाज न्यूज नेटवर्क

दिल्ली-

नवऱ्याला मारहाण करणे, शिवीगाळ करण्यामध्ये भारतीय महिलांचा जगभरात तिसरा क्रमांक आहे. तर, ब्रिटन याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर इजिप्त देश आहे.

भारतात महिलांकडून पुरूषांवर अत्याचार होत असल्याचा मुद्दा याआधी पुरूष हक्क संघटनांकडून मांडण्यात येत होता.महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना उघडकीस येतात. मात्र, नवऱ्यांना मारहाण करण्यात भारतीय महिला जगात आघाडीवर असल्याची बाब संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
पत्नीकडून होणाऱ्या अन्याय, मारहाणीच्याविरोधात भारतीय पुरूष आवाज उठवत नसल्याचे बोलले जाते. या उलट महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जेवढी सजगता दाखवण्यात येते तेवढी सजगता पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत दाखवली जात नसल्याचा मुद्दा मांडला जात आहे. नवऱ्यांना मारहाण करण्यासाठी लाटणं, चप्पल, स्वयंपाकघरातील वस्तूंचा वापर होत असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.

 

 

Click here to subscribe us on Youtube

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *