facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता
maratha

मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने शहरातील मराठा समाजबांधवांची एकजूट  होत असल्याने आगामी पालिका निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे आजवर निवडणुकीची उमेदवारी देताना फारसा लक्षात घेतला जात नसलेला ‘मराठा फॅक्टर’ यंदा कोणत्याही राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही. मराठा समाजातील उमेदवारांना कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, उमेदवारी मिळविण्यासाठी किंवा न मिळाल्यास बंडखोरीसाठी ‘मराठा कार्ड’चे हत्यारही वापरले जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षाकडे देण्यात आलेले नाही. राजकीय नेत्यांना व्यासपीठाजवळ किंवा मोर्च्याच्या अग्रभागी येण्याचीसुद्धा परवानगी नाही. त्यानंतरही मराठा मोर्च्याच्या निमित्ताने एकवटलेली ताकद बघून केवळ मराठाच नाही तर अन्य समाजांतील नेतेसुद्धा मोर्च्याच्या शेवटी चालताना दिसू लागले आहेत. या मोर्च्याचा राजकीय लाभ कुणाला होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत.

 

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *