facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / हिंगोलीतील जवान शहीद
javan

हिंगोलीतील जवान शहीद

आवाज न्यूज नेटवर्क

हिंगोली –

रात्रीच्या सुमारास त्यांच्या गस्तीच्या वाहनावर दरड कोसळली आमि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत हिंगोली जिल्हा प्रशासनाला सैन्य दलाकडून ही माहिती कळविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सेनगाव तालुक्‍यातील वझर खु. येथील बालाजी चोरमारे या जवानाचा अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना दरड कोसळून मृत्यू झाला. ते तिसरा महार बटालियनमध्ये कार्यरत होते. सध्या ते अरुणाचल प्रदेश सीमेवर कर्तव्यावर होते.

या जवानाचे पार्थिव अजून हिंगोलीकडे रवाना करण्यात आले नव्हते. शहीद झालेली वार्ता गावात पसरताच शोककळा पसरली आहे. बालाजी यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावात तर पुढील औरंगाबादला झाले. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. मागील दोन वर्षांपासून ते सेवा बजावत होते. त्यांच्या पश्‍चात आई, चार भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

 

Click here to subscribe us on youtube 

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *