facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / कोल्हापूर विमानतळ : विमानसेवेसाठी हालचाली

कोल्हापूर विमानतळ : विमानसेवेसाठी हालचाली

आवाज न्यूज नेटवर्क –
कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळावरुन ४० आसनक्षमतेपेक्षा छोट्या विमानांची सेवा सुरू करण्याबाबत सशर्त परवानगी देण्याची तयारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाखवली आहे. त्याबाबत ३० ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून त्यादृष्टीने सात दिवसात दिल्लीतून एक पथक पाहणीसाठी येणार आहे. यामुळे छोट्या आसनक्षमतेच्या विमानांच्या सेवेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंद असलेल्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २७४ कोटींचा निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यातील ३० टक्के वाटा राज्य सरकारने उचलावा, असा प्रस्ताव प्राधिकरणाने ठेवला आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासह दहा विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या (एएआय) पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक पवनकुमार नागपाल यांच्याबरोबर एएआय बोर्डाचे सदस्य एस. रहेजा, खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह एएआयचे अधिकारी, प्रधान सचिव शामलाल गोयल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (एमएडीए) विश्वास पाटील उपस्थित होते. विमानसेवा सुरु करण्याच्यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी डीजीसीएच्या दिल्लीमधील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस वनखात्याची जमीन, अतिक्रमणे यासारख्या काही अटींची पूर्तता राज्य सरकारने करुन देण्याबाबतच्या सूचना केल्या. त्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे.
विस्तारीकरणाचा मुख्य मुद्दा बैठकीसमोर होता. त्यादृष्टीने २७४ कोटींचा आराखडा तयार केला होता. आराखड्यात धावपट्टीची लांबी वाढवण्याबरोबरच हा आराखडा बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर विमानतळ सुरू नसताना २७४ कोटींचा निधी देणे शक्य नसल्याचे डीजीसीएच्यावतीने सांगितले. त्याऐवजी राज्य सरकारने त्यातील ३० टक्के वाटा उचलावा. उर्वरित निधी देऊ, असा प्रस्ताव मांडला. यानुसार सरकारकडून ८० कोटींचा निधी अपेक्षित आहे. याबाबत मंजुरी घेण्यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असे खासदार संभाजीराजे व खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. विमानतळ विस्तारीकरणाबाबत चर्चा होताना ७ ठिकाणी अतिक्रमण झाले असून दोन ठिकाणची सहा हेक्टरची जमीन आवश्यक असल्याचे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी प्राधिकरणाचे पत्र मिळताच तातडीने अतिक्रमणे हटवली जातील. तसेच वन विभागाची जमीन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासाठी १ कोटी ८० लाखाची तरतूद केल्याचे सांगितले. त्याबाबतचे प्रमाणपत्रही लवकरच सादर केले जाईल, असे सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *