facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्या

बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची आत्महत्या

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे : बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बजरंग ढेरे असे विद्यार्थ्याचे नाव असून तो कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. हॉस्टेलमधील खोलीत बजरंग ढेरेने आत्महत्या करीत आपले जीवन संपवल्यानं महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. बजरंग ढेरे याने आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अद्याप तरी आत्महत्या केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, बजरंग ढेरेच्या आत्महत्येने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *