facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / जळगाव महापालिकेला अखेर २५ कोटींचे अनुदान
jmc

जळगाव महापालिकेला अखेर २५ कोटींचे अनुदान

आवाज न्यूज नेटवर्क –
जळगाव : गेल्यावर्षी जळगाव येथे दौऱ्यावर आले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव महापालिकेला २५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला तब्बल १६ महिने झाल्यानंतर मंगळवारी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. पत्र आल्यानंतर महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांनी १७ मजली प्रशासकीय इमारतीसमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. यात, राज्यातील महापालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यातून जळगाव महापालिकेस शहरातील मुलभूत सुविधा व विकास कामांसाठी हा २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्रात म्हटले आहे. निधी वितरणासाठी कामांचा प्रस्ताव सरकारला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम प्राधान्याने करण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापौर नितीन लढ्ढांसह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाचवेळा मुंबईत मंत्रालयात या निधीसाठी पाठपुरावा केला होता. तसेच घोषणेप्रमाणे निधी मिळावा यासाठी पाच स्मरणपत्रेही दिली होती.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *