facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / दर सहा महिन्यांनी टीएमटीचे प्रवासी भाडे बदलणार
tmt

दर सहा महिन्यांनी टीएमटीचे प्रवासी भाडे बदलणार

आवाज न्यूज नेटवर्क –

ठाणे : डिझेल आणि सीएनजीच्या दरात होणारी वाढ किंवा घट, ग्राहक निर्देशांक आणि बसच्या वार्षिक देखभाल, दुरुस्तीवर होणारा खर्च यांच्या सूत्रानुसार सरकारने नेमलेल्या मे अर्वन मास ट्रान्झिट कंपनीने (युएमटीए) भाडेवाढीचे दरपत्रक तयार केले असून त्यानुसार आता दर सहा महिन्यांनी टीएमटीचे प्रवासी भाडे बदलणार आहे. दरवर्षी एक जानेवारी आणि एक जूनला भाडेवाढ किंवा कपातीचा निर्णय घेण्यात येणार असून तो पुढील सहा महिन्यांसाठी लागू असेल.

टीएमटीच्या ताफ्यात जेएनएनयूआरएम योजनेतील २०० नव्या बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. या बसखरेदीसाठी २००९ साली सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. राज्य आणि त्यापाठोपाठ केंद्र सरकारने या ५७ कोटी रुपयांच्या बसखरेदीला मंजुरी दिली होती. या बस खरेदीसाठी आवश्यक असलेले अनुदान मंजूर करताना केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या संस्थांच्या सक्षमीकरण आणि प्रभावी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार या बससेवांचे तिकीटदर नियमित करणारी कार्यप्रणाली लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यासाठी ठाणे पालिकेने मे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. परिवहन सेवा आणि प्रवासी या दोघांसाठी ही प्रणाली फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला असून ती केवळ ठाणेच नव्हे तर मुंबई महानगर प्राधिकरण परिक्षेत्रातील सर्व सार्वजनिक परिवहन सेवांसाठी लागू केली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *