facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
kdmc

दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

आवाज न्यूज नेटवर्क –
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली येथील विभागीय कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून सोमवारी रात्री रंगलेल्या ओल्या पार्टीतील कर्मचाऱ्यांची पोलखोल झाल्यानंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. कार्यालयात दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकचे कर्मचारी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान नृत्य कलाकारांवर केलेली पैशांची उधळण, त्यानंतर ड प्रभाग कार्यालयातील पाणी विभागात गटारीनिमित्त झालेली ओली पार्टी असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रताप उघड होत आहेत. पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील ३-४ कर्मचाऱ्यांची रात्री नऊच्या सुमारास ओली पार्टी सुरू होती. या पार्टीची कुणकुण लागताच पत्रकारांनी तेथे प्रत्यक्षात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी पळ काढला. मात्र पार्टीसाठी वापरलेल्या दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे-थोटके, अर्धवट भरलेले ग्लास, भाजलेले चणे तिथेच पडलेले आढळले. कांतीलाल पाटील, वाहनचालक हर्षद वाघेरे आणि केदार भोईर अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत पालिकेचे उपायुक्त दीपक पाटील यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून अहवालाअंती दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *