facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / कुपीचा मंगळाच्या वातावरणातील प्रवासाचे सिग्नल कंट्रोल रूममधील स्क्रिनवर पाहता आले.

कुपीचा मंगळाच्या वातावरणातील प्रवासाचे सिग्नल कंट्रोल रूममधील स्क्रिनवर पाहता आले.

पुणे : युरोपियन स्पेस एजन्सीची (इसा) अवकाश कुपी मंगळावर उतरण्याची घटना पुण्याजवळील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) बुधवारी यशस्वीरीत्या टिपली. मंगळाच्या वातावरणात सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून ४२ मिनिटांपर्यंतचा अवकाश कुपीचा प्रवास ‘जीएमआरटी’च्या यंत्रणेमध्ये नोंदला गेला. मात्र, अवकाश कुपी यशस्वीरीत्या मंगळावर उतरली की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
‘इसा’चे अवकाशयान मंगळाच्या कक्षेत पोहोचले असून, त्यावरील अवकाश कुपी मंगळावर उतरवण्याचा प्रयोग बुधवारी करण्यात आला. या अवकाश कुपीकडून येणारे अत्यंत क्षीण सिग्नल पकडण्याची जबाबदारी ‘जीएमआटी’वर सोपवण्यात आली होती.
‘जीएमआरटी’च्या कंट्रोलरूममध्ये बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास कुपीकडून येणारे सिग्नल मिळू लागताच शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातारवण संचारले. त्यानंतर आठ वाजून २१ मिनिटांनी कुपीने मंगळाच्या वातारवणात प्रवेश केला. कुपीकडून शेवटचा सिग्नल आठ वाजून २७ मिनिटांनी मिळाला. ‘कुपीचा मंगळाच्या वातावरणातील प्रवासाचे सिग्नल कंट्रोल रूममधील स्क्रिनवर पाहता आले. मात्र, त्यानंतर कुपीशी संपर्क तुटला. शास्त्रज्ञांना अपेक्षित असणाऱ्या बहुतेक सर्व घटना पूर्ण झाल्या असून, कुपी सुस्थितीत मंगळावर उतरली की नाही हे हाती आलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर समजेल,’ असे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सचे (एनसीआए) अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता यांनी सांगितले.
अतिशय क्षीण सिग्नल
‘इसा’च्या अवकाश कुपीकडून आलेला सिग्नल हे अत्यंत क्षीण होते. एखाद्या घरामध्ये लावण्यात येणाऱ्या पाच वॉटच्या दिव्याइतके क्षीण सिग्नल ‘जीएमआरटी’च्या कंट्रोल रूममध्ये नोंदले गेले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *