facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / जागतिक पोस्ट दिनानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमाचे.

जागतिक पोस्ट दिनानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमाचे.

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे : देशातील टपाल सेवेचा राजे-रजवाड्यांच्या काळापासूनचा इतिहास त्यानंतर कालानुरूप होत. गेलेले बदल पोस्टाच्या तिकिटांची आणि त्यातील कथांची रंगतदार सफर. पत्रपेटीत पत्र टाकल्यानंतर इच्छित स्थळापर्यंतच्या प्रवासातील विविध टप्पे बुधवारी पुणेकरांसमोर उलगडले.
निमित्त होते. जागतिक पोस्ट दिनानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमाचे. पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्या पत्र आणि पोस्टाच्या आठवणींशी संबंधित ‘हार्दिक’ या पुस्तकाचे प्रकाशन अधिकारी आणि पोस्टमनच्या हस्ते करण्यात आले.
पोस्टाचे प्रवर अधीक्षक (पूर्व) अभिजित बनसोडे, अविनाश देशमुख (पश्चिम) या वेळी उपस्थित होते. पोस्टातर्फे घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेत विभागीय स्तरावर ज्ञानदा निरगुडे, दीक्षा छाजेड आणि निकिता वर्मा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पत्र म्हणजे कागदावर खरडणे नव्हे तर, व्यक्त होणे होय. आपण पत्र लिहितो, वाचतो तेव्हा भावना हृदयातून भावना व्यक्त होतात. ही भावना लक्षात घेऊनच मी या पुस्तकाला हार्दिक हे नाव दिले. पत्र संस्कृती हरवणे म्हणजे भावनांची संस्कृती हरवणे. सर्व गोष्टींचे शॉर्टफॉर्म वापरून आपण त्यातील मूळ गंध हरवून कृत्रिमता वाढवतो आहोत, असे दवणे म्हणाले. त्यांनी हे पुस्तक पोस्टमन, पोस्ट विभाग आणि लहान मुलांना अर्पण केले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *