facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / पुणे कंपनीच्या गोदामला आग ,पाच जणांचा मृत्यु

पुणे कंपनीच्या गोदामला आग ,पाच जणांचा मृत्यु

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे – तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. यात चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई-पुण्यासह राज्यात पाच ठिकाणी आज आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या. यापैकी पुण्यातील तळेगाव-चाकण रस्त्यावर एका कंपनीच्या गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अन्य ठिकाणच्या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.

पुण्यात वारजे-माळवाडी परिसरात पीएमपीएमएलच्या बसला भीषण आग लागली. सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. सीएनजीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही बस वारजेहून चिंचवडच्या दिशेनं निघाली होती. आग लागल्याचं कळताच ड्रायव्हरनं बस बाजूला घेतली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मुंबईत कांदिवली येथील कचऱ्याला लागलेली आग अग्निशमन दलानं आटोक्यात आणली आहे. लालजीपाडा येथील के. डी. कम्पाउंडमधील केबल व प्लास्टिकला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.

औरंगाबादमधील शेंद्रा भागातील दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागली. आदित्य इंटरप्रायजेस आणि व्हिनस कंपनी अशी कंपन्यांची नावं असून या आगीत मोठी आर्थिक हानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
सांगली एमआयडीसीमधील प्लायवूडच्या कारखान्याला पहाटेच्या सुमारास आग लागली. प्लायवूडमुळं ही आग लगेचच भडकली. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *