facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / जन्मदात्रीने चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन मरणाला कवटाळले.
2

जन्मदात्रीने चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन मरणाला कवटाळले.

आवाज न्यूज नेटवर्क –

पिंपरी : मी आता मरणार आहे, असे सांगून साडीच्या मदतीने गळफास घेतला. रात्रभर दोन्ही चिमुरडी आईच्या मृतदेहाला बिलगून रडूनरडून झोपली. सकाळी उठल्यावर मुलांच्या रडण्याचा आवाज ऐनूक शेजाऱ्यांनी दार तोडून मुलांना बाहेर काढले आणि पोलिसांना बोलावले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना चाकण-येलवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि. १८) घडली.
काजल राहुल मोहिते (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल यांचे पती सुरक्षारक्षक म्हणून  काम करतात. सोमवारी (१७ ऑक्टोबर) पती रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. काजल यांच्यासह मुलगा संग्राम (५ वर्षे) आणि मुलगी लक्ष्मी (२ वर्षे) घरात होते. रात्री उशिरा काजल यांनी मी आता मरणार आहे, असे सांगून साडीच्या मदतीने गळफास घेतला. त्यानंतर तडफडत असतानाच त्यांनी हातातील चाकूने साडी कापून गळफास सोडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

साडी कापल्याने काजल खाली पडल्या. त्यांच्या तोंडाला जखम झाली. हा सर्व प्रकार संग्राम आणि लक्ष्मी पाहत होते. ते पाहून ते घाबरले आणि रडू लागले. रडतारडताच ते झोपी गेले. सकाळी जाग आल्यावर पुन्हा त्यांनी मोठमोठ्याने रडण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी मोहिते यांच्या घराचा दरवाजा तोडला. आत पोहोचल्यानंतर काजल यांचा मृतदेह खाली पडलेला आढळून आला. त्यांच्या गळ्यात साडी आणि हातात चाकू असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

‘आई, असे करू नकोस’
पोलिसांनी घाबरलेल्या संग्रामला धीर देऊन घडलेल्या प्रकाराविषयी विचारले. ‘तू असे करू नकोस, असे मी आईला सांगत होतो. मात्र, तिने ऐकलेच नाही,’ असे संग्रामने पोलिसांना सांगितले. हवालदार विलास गोसावी, अमोल बोराटे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चाकण ग्रामीण हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सहायक निरीक्षक महेश चव्हाण तपास करीत आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *