facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पिंपरीत महिलावर बलात्कार
gang-rape-1462349770

पिंपरीत महिलावर बलात्कार

आवाज न्यूज नेटवर्क

पिंपरी – आरोपीने पिंपरी-चिंचवड येथील मैत्रिणीला भेटण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. तसेच तू जर नाही आलीस, तर तुझ्या मुलाला आणि पतीला जिवे मारून टाकण्याची धमकी देऊन पिंपरी येथे आणून तिच्यावर बलात्कार केला.मैत्रिणीची भेट घालून देण्याच्या बहाण्याने आणि पती व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना चिंचवड येथील एका लॉजमध्ये नुकतीच घडली.

आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पालघर येथील एका 32 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दहीसर येथील शैलेंद्र रामचंद्र कांबळे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.  पीडित महिलेने मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत यांनी सांगितले.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *