facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पिंपरी पोलीस हवालदारांची आत्महत्या
download

पिंपरी पोलीस हवालदारांची आत्महत्या

आवाज न्यूज नेटवर्क

पिंपरी –तानाजी मसाजी बनसोडे (वय 57, रा. पंचशील कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. वाकड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी याबाबत माहिती दिली. बनसोडे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बनसोडे यांनी यापूर्वी पोलीस मुख्यालय, निगडी पोलीस ठाण्यात काम केले होत.

निगडी अतिक्रमणविरोधी विभागात कार्यरत पोलीस हवालदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास थेरगावातील पंचशील कॉलनीत घडली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
सध्या ते निगडी प्राधिकरण अतिक्रमण विभागात कार्यरत होते. 2017 मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते कामावरून घरी आले. यावेळी त्यांची पत्नी सुशिला या दारात भाजी निवडत बसल्या होत्या. बनसोडे हे घरात गेले. सुनेला मला जेवायला वाढ असे म्हणून ते आतील खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला. दरवाजा वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने पत्नी सुशिला यांनी शेजाऱ्यांना बोलविले. शेजारी राहणारे स्वप्नील कदम यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता बनसोडे हे नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सहायक निरीक्षक दिपाली आढाव तपास करत आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *