facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / प्रेमीयुगुलानी केली गोळ्या झाडून आत्महत्या !
suicide

प्रेमीयुगुलानी केली गोळ्या झाडून आत्महत्या !

आवाज न्यूज नेटवर्क

गोंदिया-गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून काजलने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला गेली होती. दिवाळीनिमित्त ती घरी आली होती. अंकितने रेल्वेत पायलटची परीक्षा उत्तीर्ण केल्याचीही माहिती आहे. दोघेही अंबाटोली परिसरात राहात होते. मंगळवारी दुपारपासून ते बेपत्ता होते. सायंकाळ होऊनही न परतल्याने पोलिस तक्रार देण्यात येणार असतानाच घिवारीनजीकच्या कालव्याशेजारी मुलगा आणि मुलीचा मृतदेह असल्याची माहिती त्यांना मिळाली. घटनास्थळी जावून पाहताच ओळख पटली. काजलचा मृतदेह धानाच्या शेतात पडला होता. तिच्या डोक्यावर बंदुकीची गोळी झाडल्याचे दिसून येत होते. तर पाच फूट दूर अंतरावर युवकाचा मृतदेह व जवळच देशी बनावटीची बंदूक पडली होती. दुचाकीही जवळच होती. त्यामुळे या दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंदुकीच्या गोळ्या झाडून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी गोंदियानजीकच्या नवाटोला (घिवारी) परिसरात समोर आली. अंकित वैद्य (२८) व काजल मेश्राम (२२) अशी त्यांची नावे आहेत.
काजल आणि अंकित यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे बंदूक कुठून आली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *