facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / बसवेश्वर पुतळ्यावरून विद्यापीठ चौकात तणाव
13516340_115290022235705_871404053873110509_n

बसवेश्वर पुतळ्यावरून विद्यापीठ चौकात तणाव

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाजवळ विद्यानगरी चौकातील आयलंड सुशोभिकरणाच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. महानगरपालिका आणि पोलिसांनी तेथून हा पुतळा हटविल्याने लिंगायत समाजासह भारिप – बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परीरसरात धरणे आंदोलन केले. त्यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण होते.

शिवाजी विद्यापीठानजीकच्या विद्यानगरी चौकात आयलंड सुशोभिकरणाचे काम महापालिकेच्यावतीने सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाकडून केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे आयलंडमध्ये अज्ञात व्यक्तींनी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविल्याचे परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी या घटनेची माहिती महापालिका प्रशासन आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने हा विनापरवाना बसवलेला पुतळा हटवला. या घटनेची माहिती समजताच भारिप बहुजन महासंघ, लिंगायत समाजाच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळा पूर्ववत ठेवावा असा आग्रह ध्रला. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतळा पूर्ववत बसवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका घेत आंदोलकांनी घटनास्थळीच धरणे आंदोलन केले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *