facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / शिवकाशी मधील फाटका कारखान्यात आग
sk

शिवकाशी मधील फाटका कारखान्यात आग

शिवकाशी, (तामिळनाडू) –

फटाक्‍यांमुळे लागलेल्या या आगीमध्ये किमान आठजण मरण पावले. मृतांमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकारी ए शिवगनाम यांनी सांगितले. बहुतेकजणांचा मृत्यू हा स्फोटातील आगीत होरपळल्यामुळे झाला नसून फटाक्‍यांच्या धुरात गुदमरल्यामुळे झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. गुदमरल्यामुळे जखमी झालेल्यांना सरकारी आणि काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांना मदुराई येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशभरात फटाके शिवकाशीवरूनच पुरवले जातात. त्यामुळे सध्याचा हंगाम हा शिवकाशीसाठी सर्वात धामधुमीचा असतो.

 

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *