facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / शिवसेना -भाजप युती तुटली ?
images

शिवसेना -भाजप युती तुटली ?

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी सेनेचे जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांच्या बैठकीत आज बैठक झाली. या बैठकीत मुंबई वगळता सर्व स्थानिक निवडणुकांत स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरे यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं ऐनवेळी युती तोडल्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी होऊन बेसावध शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.  देशाची आर्थिक राजधानी व शिवसेनेचा गड असलेल्या मुंबई महापालिकेबाबत कोणताही निर्णय न घेता येथील युतीचा चेंडू सेनेनं भाजपच्या कोर्टात ढकलण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं.

राज्यातील सत्तेत भाजपच्या मांडीला मांडी बसलेल्या शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा असाच धोका होऊ नये म्हणून शिवसेनेनं वेळीच सावध झाली आहे. भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता शिवसेनेनं पक्षपातळीवर निर्णय घेऊन टाकल्याचं समजतं. अर्थात, याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *