facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / हत्येपूर्वी मुलीची छेड काढून विनयभंग केला
6-kopardi-case

हत्येपूर्वी मुलीची छेड काढून विनयभंग केला

आवाज न्यूज नेटवर्क –

नगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीची हत्या होण्यापूर्वी चार दिवस आधी शाळेतून येत असताना आरोपींनी तिची छेड काढून विनयभंग केला होता. तिन्ही आरोपींनी नियोजितपणे कट रचून हे कृत्य घडवून आणले असल्याने तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार व हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात यावा,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. उज्ज्वल निकम यांनी बुधवारी केला. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चितीवर सरकारी पक्षाकडून बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला.

या खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू झाली आहे. यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ यांना सरकारी खर्चातून विधी सेवा प्राधिकरणाकडून अॅड. योहान मकासरे हे वकील देण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यासाठी अॅड. निकम यांनी गुन्ह्याचा पंचनामा व घटनास्थळावरून युक्तिवादाला सुरुवात केली. या खटल्यात ७० साक्षीदार असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ‘मुलगी शाळेतून येत असताना आरोपी जितेंद्र शिंदे याने तिची छेड काढून विनयभंग केला होता. त्यावेळी इतर दोन्ही आरोपी त्याच्याबरोबर होते. त्यावेळी हिचाकडे बघून असे या आरोपीने म्हटले होते. याबाबत एक साक्षीदार आहे. तिन्ही आरोपी हत्येपूर्वी सलग दोन दिवस या रस्त्यावर एकत्र फिरताना दिसल्याचा एक साक्षीदार आहे. त्यानंतर या मुलीची निर्घृणपणे हत्या झाली. तेथून शिंदे हा आरोपी पळताना साक्षीदाराने पाहिले आहे,’ असा युक्तिवाद निकम यांनी केला.
या साक्षीदारांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. या आरोपींविरुद्ध आरोपनिश्चितीसाठी लेखी मसुदा न्यायालयाला देण्यात आला आहे. आरोप निश्चितीवर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण झाला असून, आरोपनिश्चितीवर गुरुवारी न्यायालय निर्णय घेणार आहेत.

सबजेलाचा नकार

सलग तीन दिवस सुनावणी असल्याने तिन्ही आरोपींना येथील सबजेलमध्ये ठेवण्यास न्यायालयाने सांगितले होते. परंतु सबजेलच्या प्रशासनाने जागा नसल्याने आरोपी ठेवण्यास नकार दिला आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *