facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / RJ शुभमचा मृत्यू,लाईव्ह शोदरम्यान हार्ट अटॅक
14702257_637393003097508_7477904849435774185_n

RJ शुभमचा मृत्यू,लाईव्ह शोदरम्यान हार्ट अटॅक

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर :

शुभम रेडिओ मिर्ची अर्थात 98.3 एफएम वाहिनीत काम करत होता. सकाळी 7 ते 11 दरम्यान त्याचा  ‘हाय नागपूर’ हा शो असायचा. रोजच्या प्रमाणे आजही त्याचा हा शो सुरु होता. मात्र सकाळी 9.30 च्या सुमारास, ब्रेकमध्ये तो शौचालयात गेला. मात्र ब्रेक उलटून गेला तरी शुभम परतला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली.

शुभम केचे असं या आरजेचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे लाईव्ह शोदरम्यान ब्रेकमध्येच शुभमचा मृत्यू झाला.

सहकाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तरुण रेडिओ जॉकी शुभमच्या मृत्यूने नागपूरमध्ये शोकाचं वातावरण आहे

Check Also

fadnavis

मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‌विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *