facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / शाळकरी मुलीवर अतिप्रसंग आणि केला कटरने वार

शाळकरी मुलीवर अतिप्रसंग आणि केला कटरने वार

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे-देवदास भीमप्पा मरटी (वय ४५) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी १७ ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास मंडईतील रामेश्वर हॉटेलजवळून मैत्रिणीसमवेत शाळेला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला.

तिच्याकडे पाहून शिट्टय़ा वाजवून तिची छेड काढली. त्यानंतर तो पळून जात असताना मुलीने त्याचा पाठलाग केला. मंडईतील भाजीमार्केटमध्ये मुलीने त्याला गाठले. त्या ठिकाणी तिने त्याला चप्पलने मारहाण केली.

शाळकरी मुलीची रस्त्यात छेड काढल्यानंतर संबंधित मुलीने चप्पलने मारल्याच्या रागातून तिच्यावर भररस्त्यात कटरने वार केल्याच्या प्रकरणात पंचेचाळीस वर्षे वयाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीवर वार करण्याची घटना बुधवारी घडली होती. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला बारा तासातच जेरबंद केले.

 

 

याप्रकरणी विश्रामबाग पोली ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. मात्र, त्यावरून तपास घेण्यात आला असता मरटी याचे नाव समोर आले. तो फिरस्ता असून, घटनेत वापरलेले कटर पोलिसांना त्याच्याकडे मिळाले.

संबंधित मुलगी १९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता गोपाळ हायस्कूलजवळ चिमण्या गणपती चौक येथे आली असता तिने केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपी मरटी याने पाठीमागून येत तिच्यावर कटरने वार केले.

त्यात तिच्या पोटावर व हातावर जखमा झाल्या. वार करून मरटी पळून गेला होता.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट, निरीक्षक (गुन्हे) सुनील िपजण, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, हवालदार शरद वाकसे तसेच बाबा दांगडे, आनंद बाबर, संजय बनसोडे, धीरज पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आवाज न्यूज नेटवर्क पुणे-देवदास भीमप्पा मरटी (वय ४५) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी १७ ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास मंडईतील रामेश्वर हॉटेलजवळून मैत्रिणीसमवेत शाळेला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्याकडे पाहून शिट्टय़ा वाजवून तिची छेड काढली. त्यानंतर तो पळून जात असताना मुलीने त्याचा पाठलाग केला. मंडईतील भाजीमार्केटमध्ये मुलीने त्याला गाठले. त्या ठिकाणी तिने त्याला चप्पलने मारहाण केली. शाळकरी मुलीची रस्त्यात छेड काढल्यानंतर संबंधित मुलीने चप्पलने मारल्याच्या रागातून तिच्यावर भररस्त्यात कटरने वार केल्याच्या प्रकरणात पंचेचाळीस वर्षे वयाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीवर वार करण्याची घटना बुधवारी घडली होती. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला बारा…
User Rating: Be the first one !

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *