facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / नवरा वेळ देत नाही मानून केली आत्महत्या !

नवरा वेळ देत नाही मानून केली आत्महत्या !

आवाज न्यूज नेटवर्क

औरंगाबाद –

औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगाव-रामगोपाळनगरमध्ये ही घटना घडली. प्रवलिका टेरम मनोहर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे पती आयसीआयसीआय बँकेत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले.

 नवरा वेळ देत नसल्याने निराश झालेल्या पत्नीने नवऱ्याला सेल्फी पाठवून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी तमिळ भाषेत सुसाइड नोट सापडली असून त्याआधारे तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवलिकाचा महिनाभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी भरपूर वेळ देणारा नवरा लग्नानंतर बदलला. लग्नानंतर तो आपल्याला वेळच देत नाही, अशी तिची सतत तक्रार होती. त्याच रागाने प्रवलिकाने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. प्रवलिकाने रामगोपाळनगर येथे घरातच आत्महत्या केली. त्याआधी तिने सेल्फी नवऱ्याला पाठवला. त्यामुळे शंका आल्याने नवरा तातडीने बँकेतून घरी निघाला पण त्याआधीच प्रवलिकाचा मृत्यू झाला होता.

 

आवाज न्यूज नेटवर्क औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगाव-रामगोपाळनगरमध्ये ही घटना घडली. प्रवलिका टेरम मनोहर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे पती आयसीआयसीआय बँकेत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले.  नवरा वेळ देत नसल्याने निराश झालेल्या पत्नीने नवऱ्याला सेल्फी पाठवून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी तमिळ भाषेत सुसाइड नोट सापडली असून त्याआधारे तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवलिकाचा महिनाभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी भरपूर वेळ देणारा नवरा लग्नानंतर बदलला. लग्नानंतर तो आपल्याला वेळच देत नाही, अशी तिची सतत तक्रार होती. त्याच रागाने प्रवलिकाने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. प्रवलिकाने रामगोपाळनगर येथे घरातच आत्महत्या केली.…

User Rating: Be the first one !

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *