facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / पाक कलाकारांना घेणार असेल तर आर्मीला ५ कोटी दया – राज ठाकरे

पाक कलाकारांना घेणार असेल तर आर्मीला ५ कोटी दया – राज ठाकरे

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई-करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात पाक अभिनेता फवाद खानची भूमिका असल्याने मनसेने या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ठरलेल्या वेळी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार की नाही, असा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे, करण जोहर आणि प्रोड्युसर्स असोसिएशनचे सदस्य मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत सन्मान्य तोडगा काढण्यात आला.

मनसे चित्रपट सेनेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सातत्याने आवाज उठवला. उरी हल्ल्यानंतर पाक कलाकारांवर पू्र्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. त्यातूनच ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. या संपूर्ण आंदोलनाचा परिणाम म्हणून पाक कलाकारांवर पूर्णपणे बंदी आली आहे, असे राज यांनी सांगितले.

 

मनसेच्या काही अटी

 

– ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणारा संदेश दाखवण्यात यावा.

– आजपासून एकाही पाक कलाकाराला, गायकाला काम देणार नाही, अशी लेखी हमी प्रोड्युसर्स गिल्डने द्यावी.

– पाक कलाकाराला याआधी प्रदर्शित झालेल्या किंवा शुटिंग पूर्ण झालेल्या कोणत्याही चित्रपटात काम दिलं असेल तर अशा निर्मात्याने प्रायश्चित्त म्हणून प्रत्येकी पाच कोटींचा धनादेश सैनिक कल्याण निधीसाठी द्यावा.

– देशाच्या संरक्षण मंत्र्यांकडे हा धनादेश तत्काळ जमा करून त्याचा पुरावा म्हणून फोटो जाहीर करावा.

आवाज न्यूज नेटवर्क मुंबई-करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात पाक अभिनेता फवाद खानची भूमिका असल्याने मनसेने या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ठरलेल्या वेळी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार की नाही, असा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे, करण जोहर आणि प्रोड्युसर्स असोसिएशनचे सदस्य मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत सन्मान्य तोडगा काढण्यात आला. मनसे चित्रपट सेनेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सातत्याने आवाज उठवला. उरी हल्ल्यानंतर पाक कलाकारांवर पू्र्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. त्यातूनच 'ऐ दिल…

User Rating: Be the first one !

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *