facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / फक्त १२० रुपये अभावी गमवले सरपंच पद

फक्त १२० रुपये अभावी गमवले सरपंच पद

आवाज न्यूज नेटवर्क

औरंगाबाद –

धुळे जिल्ह्यातील सुकवड येथील ग्रामपंचायतची निवडणूक सन 2012 मध्ये झाली. या निवडणुकीत चंद्रकला युवराज पाटील या ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या. निवडणुकीनंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 14 (बी) नुसार 30 दिवसात निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करणे आवश्‍यक आहे. चंद्रकला पाटील यांनी निवडणूक खर्च हा मे रोजी सादर केला. साधारण अडीच वर्षानंतर त्यांनी खर्च सादर केला. अन्य ग्रामपंचायत सदस्य हेमराज पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीवरुन विलंबाने खर्च सादर करण्याची ही बाब उघडकीस आली. त्यामुळे हेमराज पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

पाटील यांनी मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सरपंच पद रद्द केले. त्या आदेशाला चंद्रकला पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करुन त्यांचे सरपंच पद कायम ठेवले. त्यानंतर तक्रारदार हेमराज पाटील यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ऍड. मदन पाटील यांच्या मार्फत खंडपीठात आव्हान दिले.

बिनविरोध निवडून आलेल्या महिला सरपंचाने अवघ्या 120 रुपयांचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर केला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी दिले आहेत.निवडणूक नियमावलीनुसार निवडणुकीचा खर्च 30 दिवसात सादर करणे आवश्‍यक असताना, सदर ग्रामपंचायत सदस्याने अडीच वर्षानंतर हिशोब सादर करणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे ऍड. मदन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. सुनावणीनंतर सरपंच चंद्रकला पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

Subscribe us on Youtube 

 

आवाज न्यूज नेटवर्क औरंगाबाद – धुळे जिल्ह्यातील सुकवड येथील ग्रामपंचायतची निवडणूक सन 2012 मध्ये झाली. या निवडणुकीत चंद्रकला युवराज पाटील या ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या. निवडणुकीनंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 14 (बी) नुसार 30 दिवसात निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करणे आवश्‍यक आहे. चंद्रकला पाटील यांनी निवडणूक खर्च हा मे रोजी सादर केला. साधारण अडीच वर्षानंतर त्यांनी खर्च सादर केला. अन्य ग्रामपंचायत सदस्य हेमराज पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीवरुन विलंबाने खर्च सादर करण्याची ही बाब उघडकीस आली. त्यामुळे हेमराज पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सरपंच पद रद्द…

User Rating: Be the first one !

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *