facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस प्रणीत शहर विकास समितीमध्ये फुट

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस प्रणीत शहर विकास समितीमध्ये फुट

आवाज न्यूज नेटवर्क
तळेगाव –
शहरविकास समितीचा कारभार मनमानी पद्धतीने चालू असल्याचा आरोप करत  जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, नगरसमितीचे निमंत्रक चंद्रभान खळदे यांनी तळेगाव शहराच्या  विकासासाठी नवीन राजकीय आघाडी स्थापन करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्तारूढ शहर विकास समितीमध्ये फूट पडून तळेगाव जनसेवा विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भाजप, तळेगाव जनसेवा विकास समिती आणि आरपीयआय  यांनी एकत्रितपणे  निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय आज जाहीर केला.
यावेळी भाजपचे आमदार संजय  भेगडे,  ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी जनसेवा विकास समिती व आरपीयआयबरोबर महायुती करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
 यावेळी शहरविकास समितीतर्फे नगराध्यक्षा पदाची संधी मिळालेल्या सुलोचना आवारे यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, शहराध्यक्ष संतोष दाभाडे, आरपीयआय  शहराध्यक्ष संजय सोनवणे, समितीचे प्रवक्ते संग्राम काकडे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे, सुशील सैंदाणे, चंद्रकांत शेटे आणि चंद्रकांत काकडे आदी उपस्थित होते.
आवाज न्यूज नेटवर्क तळेगाव - शहरविकास समितीचा कारभार मनमानी पद्धतीने चालू असल्याचा आरोप करत  जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, नगरसमितीचे निमंत्रक चंद्रभान खळदे यांनी तळेगाव शहराच्या  विकासासाठी नवीन राजकीय आघाडी स्थापन करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. सत्तारूढ शहर विकास समितीमध्ये फूट पडून तळेगाव जनसेवा विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भाजप, तळेगाव जनसेवा विकास समिती आणि आरपीयआय  यांनी एकत्रितपणे  निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय आज जाहीर केला. यावेळी भाजपचे आमदार संजय  भेगडे,  ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी जनसेवा विकास समिती व आरपीयआयबरोबर महायुती करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.  यावेळी शहरविकास समितीतर्फे नगराध्यक्षा पदाची संधी मिळालेल्या…

0

User Rating: Be the first one !

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *