facebook
Thursday , February 23 2017
Breaking News
Home / Featured / ६.२ रिश्‍टर तीव्रतेच्या भुकंप जपानमध्ये

६.२ रिश्‍टर तीव्रतेच्या भुकंप जपानमध्ये

आवाज न्यूज नेटवर्क

टोकियो –

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू तोत्तोरी भागात जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटरवर होता. या भूकंपाची तीव्रता आगोदर 6.6 रिश्‍टर असल्याचे युएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले होते. मात्र नंतर त्यात दुरुस्ती करण्यात आली. भूकंपामुळे युरिहामा भागात एक घर पडले. तर दुसऱ्या भागात गॅसवाहिनी फुटल्यामुळे आग लागली. मात्र त्या दुर्घटनांबाबत अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. सकृतदर्शनी भूकंपामुळे मोठी जिवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील अणू प्रकल्प बंद करण्यात आला आहे.

जपानच्या पश्‍चिम भागाला आज 6.2 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने ही माहिती दिली. या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण होण्याचा कोणताही धोका नसल्याचेही म्हटले आहे.

हा भाग भूस्तरांच्या सीमेवर असल्याने वारंवार भूकंपाचे धक्के येथे जाणवत असतात. अशाच भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे जपानच्या ईशान्येकडील समुद्रकिनाऱ्याला 2011 साली भीषण त्सुनामी लाटांचे तडाखेही बसले होते. त्यामुळे फुकुशिमा येथील अणूप्रकल्पातील अणू भट्टया बंद कराव्या लागल्या होत्या. एप्रिल महिन्यात कुमामाओतो भागाला बसलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर सुमारे 1.700 लहान मोठे धक्केही जाणवले होते. त्यामध्ये 50 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *