facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / इंडिअन आर्मीने केलेल्या गोळीबारात ७ पाक सैनिक ठार
3

इंडिअन आर्मीने केलेल्या गोळीबारात ७ पाक सैनिक ठार

आवाज न्यूज नेटवर्क 

देश-

कथुआ आणि सांबा जिल्ह्यात पाकिस्तानने गुरुवारपासून सीमेपलीकडून जोरदार गोळीबार चालवला आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी या परिसरात तोफांचा माराही केला. या ताबा रेषेवरून भारतात घुसू पाहणाऱ्या सहा दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पिटाळून लावले होते. भारतीय जवानांनी शुक्रवारी सकाळपासूनच या गोळीबाराला तोडीसतोड उत्तर दिले. यात सात पाकिस्तानी सैनिक ठार तर तीन गंभीर जखमी झाले. सीमा सुरक्षा दलाच्या हिरानगर क्षेत्रातील तळावर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात गुरनाम सिंग हा जवान गंभीररीत्या जखमी झाला.

काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांकडून गुरुवारपासून सुरू असलेल्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले. तर, तीन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानने मात्र नेहमीप्रमाणे कांगावा करत आपला एकही सैनिक ठार झाला नसल्याचा दावा केला आहे.

आवाज न्यूज नेटवर्क  देश- कथुआ आणि सांबा जिल्ह्यात पाकिस्तानने गुरुवारपासून सीमेपलीकडून जोरदार गोळीबार चालवला आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी या परिसरात तोफांचा माराही केला. या ताबा रेषेवरून भारतात घुसू पाहणाऱ्या सहा दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पिटाळून लावले होते. भारतीय जवानांनी शुक्रवारी सकाळपासूनच या गोळीबाराला तोडीसतोड उत्तर दिले. यात सात पाकिस्तानी सैनिक ठार तर तीन गंभीर जखमी झाले. सीमा सुरक्षा दलाच्या हिरानगर क्षेत्रातील तळावर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात गुरनाम सिंग हा जवान गंभीररीत्या जखमी झाला. काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांकडून गुरुवारपासून सुरू असलेल्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत पाकिस्तानचे सात…

User Rating: Be the first one !

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *