facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचे यांचे निधन
ashwini-ekbote

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचे यांचे निधन

आवाज न्यूज नेटवर्क

पुणे- पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच अश्विनी एकबोटे यांना मृत्यूने गाठले. नाटकाच्या प्रयोगातील एका गाण्यावर त्यांनी नृत्य सादर केले. रात्री ८.१५ च्या सुमारास त्या कार्यक्रमातील शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या सहजसुंदर नृत्याला प्रेक्षकांनीही दाद दिली. नृत्य सादर करुन झाल्यावर त्या अखेरच्या क्षणी तोल जाऊन रंगमंचावर कोसळल्या. त्यांनी त्वरित पेरुगेटजवळील गोरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध रंगकर्मी आणि अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले आहे. शनिवारी पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. प्रयोग सुरु असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला . त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे.

 

अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून घराघरामध्ये पोहोचल्या होत्या. असंभव मालिकेतील त्यांची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा माोरया’ या मालिकेत रावणाच्या आईच्या भूमिकेत दिसत होत्या. अश्विनी एकबोटे यांनी बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी चित्रपटात देखील काम केले होते.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *