facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / अनंत कोऱ्हाळे यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

अनंत कोऱ्हाळे यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

आवाज न्यूज लाईन

पिंपरी – मनसेचे नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या पत्नी गायत्री कोऱ्हाळे तसेच राष्ट्रवादीच्या सरिता साने, ऍड. सचिन भोसले, कॉंग्रेसचे बाळासाहेब वाल्हेकर, कामगार नेते हनमंत लांडगे यांनी आज (सोमवारी) मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभाताई उबाळे, नगरसेवक निलेश बारणे, संपत पवार, धनंजय अल्हाट, गजानन चिंचवडे, योगेश बाबर, भगवान वाल्हेकर, शिवसेना पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी-चिंचवड शहरातील मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली असून प्रत्येक प्रभागात ताकदीचे उमेदवार उभे करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेला मानणारा मोठा मतदार व जनाधार पिंपरी चिंचवड शहरामध्ये असल्याने चांगल्या ताकदीचे कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *