facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / भिवंडीत 266 टन धान्यसाठा जप्त

भिवंडीत 266 टन धान्यसाठा जप्त

आवाज न्यूज लाईन

ठाणे – सध्याच्या सणासुदीच्या काळात भिवंडीतील एका गोदामात बेकायदेशीररीत्या केलेल्या धान्यसाठ्यावर पोलिसांनी धाड घातली. काल झालेल्या या कारवाईत तब्बल 266 टन धान्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी 3 जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानातील धान्यसाठा बेकायदेशीररीत्या परस्पर वळवून एका खासगी गोडाऊनमध्ये त्याचा साठा करण्यात आल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत संबंधीत गोडाऊनवर रविवारी छापा टाकला. यात 266 टन धान्य जप्त करण्यात आले. यामध्ये तांदूळ आणि गव्हाचा समावेश आहे. ज्याची बाजारातील किंमत 63.60 इतकी आहे. या प्रकरणी संबधीत गोडाऊनच्या व्यवस्थापकासह तीन जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. भिवंडीत दापोडा भागातील कृष्णा कंपाऊंड येथे हे गोडाऊन आहे. ठाणे आणि मुंबईतील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमधून हा धान्यसाठा या गोडाऊनमध्ये वळवण्यात आला होता. या साठ्यातील धान्य हे 50 किग्रॅच्या गोण्यांमध्ये पुन्हा पॅकिंगकरून काळया बाजारात विकण्यात येत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पासलकर यांनी ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या तीघांमध्ये श्रीनिवास मेरगू (35) या व्यवस्थापकासह इंद्रसेन गौड (38) आणि फिरोज अहमद मुस्ताक अहमद अन्सारी (32) या दोन वाहन चालकांचा समावेश आहे. या तीघांवर धान्यसंपत्तीच्या वितरणात फसवूणक आणि अप्रामाणिकपणा दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्या स्वस्त धान्य दुकानांतून हा गैरप्रकार झाला आहे, त्याच्या मालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *