facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीला काँग्रेसने हायजॅक केलंय- आ. प्रशांत परिचारक
164848-prshsnth

पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीला काँग्रेसने हायजॅक केलंय- आ. प्रशांत परिचारक

Facebook Like

आवाज न्यूज लाईन

पंढरपूर (नागनाथ सुतार ):- पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी संपलेली असून काँग्रेस आयच्या लोकांनी येथील राष्ट्रवादीला हायजॅक केले आहे. राष्ट्रवादी येथे फक्त नावालाच शिल्लक आहे. पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी ही काही काँग्रेस नेत्यांची गुलाम होवून बसली असल्याचे असे मत आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. यांच्यासाठी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांनीच अडचणीच्या काळात परिचारक गटाला एकटे पाडले. 2009 मध्ये मालकांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला.

यावेळी आम्हाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. त्यावेळी मार्केट यार्डात पाच हजार कार्यकर्ते यांच्या उमेदवाराला विरोध दर्शविण्यासाठी थांबलेले होते तेंव्हा मी यांच्या उमेदवारांच्या अर्जावर सुचक म्हणून सही केलेली होती. आम्ही शब्दाला पक्के आहोत.  शब्द पाळण्यासाठी 25 वर्ष सांभाळलेली आमदारकी ज्यांच्यासाठी कर्मयोगी सुधाकरपंतांनी एका सेकंदात सोडली. त्यांनी मात्र आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला मागील पाच-सहा वर्षात खुप त्रास झाला. परंतु  परिचारक गटाचे कार्यकर्ते मात्र एकनिष्ठ राहिले.  पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अठरा पगड जाती-जमातींना समान संधी दिली जाईल. असेही ते म्हणाले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *