facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो लॉन्च
maxresdefault

सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो लॉन्च

 

आवाज न्यूज लाईन

मुंबई :

या नव्या C9 प्रो स्मार्टफोनमध्ये 6 इंचाचा डिस्प्ले (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन) आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 653 प्रोसेसर आहे. 6 जीबी रॅम या स्मार्टफोनचं आकर्षण असून, 64 जीबी इंटरल स्टोरेज देण्यात आला आहे. एसडी कार्डच्या सहय्याने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोनप्रेमी ज्याची वाट पाहत होते, तो सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो अखेर लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 6 जीबी रॅम. हा स्मार्टफोन सध्या चीनमधील स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 31 हजार रुपये आहे.

 

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी स्मार्टफोनध्ये f/1.9 अपॅरचरसोबत 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठीही हा स्मार्टफोन खास ठरणार आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य आहे.

उत्तम क्वालिटीच्या ऑडिओसाठी HiFi Codec देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग पे आणि NFC सपोर्टिव्ह आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 4G LTE, Type-C पोर्ट, जीपीएससारखे फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *