facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / आमदार महेश लांडगे यांचा भाजप मध्ये प्रवेश

आमदार महेश लांडगे यांचा भाजप मध्ये प्रवेश

आवाज न्यूज लाईन

पुणे –

महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला पायउतार करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मंगळवारी आमदार महेश लांडगे यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे, शैलेश मोरे, नंदू दाभाडे, संतोष लांडगे, नवनाथ लांडगे, नितीन लांडगे, सतीश लांडगे,आदी उपस्थित होते.

भोसरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी अखेर आपले समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दोन वर्षांपासून प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावरच आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांची मुख्यमंत्री फडवणीस यांच्या उपस्थित बैठक झाली होती. त्यावेळी भोसरीसह शहरातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. भोसरीसह शहरातील प्रमुख प्रश्न मार्गी लावावे, याच अटीवर आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना पक्षप्रवेशाबाबत शब्द दिला होता.
विशेष म्हणजे, खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची गोपणीय बैठक नुकतीच झाली आहे. त्यामध्ये शहरातील राजकीय वातावरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार करायचे असल्यास शिवसेनेसोबत युती करण्याची तयारीही तिघांनी केली आहे. खासदार साबळे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे “महायुती’साठी खासदार साबळे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असेही यावेळी निश्‍चित केले आहे.
वास्तविक, खासदार श्रीरंग बारणे यांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी राजकीय मतभेद आहेत. तसेच, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी आमदार महेश लांडगे यांच्याशी मतभेद आहेत. हाच महायुती’तील प्रमुख अडथळा आहे. मात्र, आमदार लांडगे आणि खासदार बारणे यांच्याशी सलोखा आहे. त्याचप्रमाणे आमदार जगताप यांनी खासदार आढळराव पाटील यांच्याशी जुळवून घेतले आहेत. त्यामुळे महायुती’साठी आपसातील मतभेद बाजुला ठेवून महापालिकेत सत्ता मिळवणे…याच अटीवर आमदार लांडगे आणि जगताप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामध्ये खासदार साबळे यांनी यशस्वी शिष्टाई केली आहे.

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *