facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Crime / टॅंकरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

टॅंकरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

आवाज न्यूज लाईन

पिंपरी(आकुर्डी) –

जितेंद्र रामू सरोज असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सायकलवरुन कॉलेजला जात असताना पाण्याच्या टॅंकरची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजजवळ झाला आहे.

घटनेनंतर टॅंकरचालक फरार झाला असून, देहूरोड पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा त्याच्या सायकलवरुन कॉलेजला जात होता. त्यावेळी पाठिमागून येणाऱ्या पाण्याच्या टॅंकरची धडक त्याला बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला पिंपरी येथील “वायसीएम’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. घटनेनंतर टॅंकर चालक फरार झाला असून, देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *