facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / बँक ऑफ बडोदा मध्ये झाली फसवणूक

बँक ऑफ बडोदा मध्ये झाली फसवणूक

आवाज न्यूज लाईन

पुणे –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑगस्ट 2014 साली कोथरूड येथील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत एचपीएल नामक मशीन घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. त्याद्वारे त्यांनी 88 लाख 50 हजार रूपयो कर्ज घेतले. त्यानंतर आरोपीने कर्जाचे हप्ते दिलेच नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात अधिक तपास केला असता बॅंकेची फसवणूक झाल्याचे समजले.

मशीन खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्राद्वारे 88 लाख 50 हजार रूपये कर्ज घेऊन परत न केल्यामुळे कोथरूड येथील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. आरोपीचे नाव श्रीशेखर प्रभारकर कुडीलीकर  असे आहे. याप्रकरणी विरेंद्र शंकर माथूर  यांनी फिर्याद दिली आहे.

 

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *