facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / सचिन शेळके खूनप्रकरणी कोठडीत वाढ

सचिन शेळके खूनप्रकरणी कोठडीत वाढ

आवाज न्यूज नेटवर्क

तळेगाव दाभाडे :

पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी सकाळी  येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. श्याम दाभाडेसह त्याचे काही साथीदार फरार आहेत.

पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर , सूरज विलास गायकवाड , नितीन शिवाजी वाडेकर  या तीन आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत. या आठही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपली असल्याने त्यांना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ सुनावली

रुपेश सहादू घारे , राजेश दादाभाऊ ढवळे , शिवाजी भरत आढाव , अमित अनिल दाभाडे , सचिन लक्ष्मण ठाकर  या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा नोव्हेंबरपर्यंत वडगाव न्यायालयाने वाढ केली आहे.

 

 

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *